1
योहान 15:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.
Параўнаць
Даследуйце योहान 15:5
2
योहान 15:4
म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.
Даследуйце योहान 15:4
3
योहान 15:7
परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल.
Даследуйце योहान 15:7
4
योहान 15:16
तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले व तुमची नेमणूक केली. ती यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे—म्हणजे तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे.
Даследуйце योहान 15:16
5
योहान 15:13
आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही.
Даследуйце योहान 15:13
6
योहान 15:2
माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.
Даследуйце योहान 15:2
7
योहान 15:12
माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
Даследуйце योहान 15:12
8
योहान 15:8
तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे.
Даследуйце योहान 15:8
9
योहान 15:1
“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.
Даследуйце योहान 15:1
10
योहान 15:6
जर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, तर त्या फांदीसारखे आहात जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून अग्नीत टाकून जाळतात.
Даследуйце योहान 15:6
11
योहान 15:11
मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे कारण माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा.
Даследуйце योहान 15:11
12
योहान 15:10
जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल.
Даследуйце योहान 15:10
13
योहान 15:17
ही माझी आज्ञा आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.
Даследуйце योहान 15:17
14
योहान 15:19
जर तुम्ही जगाचे असता, तर स्वतःवर करावी अशी त्यांनी तुमच्यावर प्रीती केली असती. परंतु तुम्ही जगाचे नाही, या जगातून मी तुमची निवड केली आहे. त्या कारणाने जग तुमचा द्वेष करते.
Даследуйце योहान 15:19
Стужка
Біблія
Пляны чытаньня
Відэа