मत्तय 4

4
येशु नि परीक्षा
(मार्क 1:12-13; लूक 4:1-13)
1तव पवित्र आत्मा येशु ले उजाळ जागा मा लीग्या कि सैतान तेनी परीक्षा करोत. 2येशु चाळीस दिन, आणि चाळीस रात बिगर काही खावाना ऱ्हायना, तव तेले भूक लागणी. 3तव सैतान तेना जोळे उना आणि तेले सांग, जर तू परमेश्वर ना पोऱ्या शे त ह्या दघळस्ले आज्ञा दिसन साबित कर कि त्या भाकरी बनी जावोत, एनासाठे कि तू तेस्ले खाई सको. 4येशु नि तेले उत्तर दिधा “परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, माणुस फक्त भाकरीस्वर नई, पण तो परमेश्वर ना सांगेल प्रत्येक वचनस्ले मानीसन जित्ता राहीन.” 5तव सैतान तेले पवित्र शहर यरूशलेम मा लिसन ग्या, आणि परमेश्वर ना मंदिर ना सर्वास्तून उच्चा टोक वर उभा करना. 6आणि सैतान नि सांग, कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे, त स्वता ले खाले पाळीसन साबित कर, कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा हय लिखेल शे, “तो तुना बारामा आपला दूतस्ले आदन्या दिन, आणि त्या तुले हातो-हात समाई लेतीन, कदी अस नई होवो कि तुना पाय ले दघळ कण ठेस लागो.” 7येशु नि तेले सांग, “परमेश्वर नि पुस्तक मा हय बी सांगस,” “तू प्रभु आपला परमेश्वर नि परीक्षा नको लेवू.” 8मंग सैतान तेले उच्चा डोंगर वर लिसन ग्या. आणि सर्वा जग ना राज्य व तेना वैभव दाखाळीसन. 9तेले सांग, कदी तू पडीसन मले नमन करत मनी उपासना करशीन, त मी हय सगळ काही तुले दि दिसू. 10तव येशु नि तेले सांग, “हे सैतान दूर चालना जाय, कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तू प्रभु आपला परमेश्वर ले पडीसन नमन कर, आणि फक्त तेनीच उपासना कर.” 11तव सैतान तेना पासून चालना ग्या, आणि परमेश्वर ना दूत ईसन येशु नि सेवा करणात.
येशु ना सेवा-कार्य नि सुरुवात
(मार्क 1:14,15; लूक 4:14,15,31)
12जव येशु हय आयकना, कि योहान ले बंदीगृह मा टाकी दियेल शे, तव येशु यहूदा जिल्हा ले सोळीसन, परत गालील जिल्हा ले चालना ग्या. 13आणि नासरेथ नगर ले सोळीसन कफर्णहूम नगर मा जो गालील जिल्हा ना समुद्र ना किनारा वर स्थित होता, जठे जबुलून आणि नफताली ना गोत्र राहत होतात, तठे येशु जाईसन राहाले लागणा. 14हय एनासाठे हुईन कि जे यशया भविष्यवक्ता कळून सांगामा एयेल होत, ते पूर्ण होवो. 15“तुमी लोक ज्या जबुलून गोत्र ना अधिकार वाला क्षेत्र मा आणि नफताली गोत्र ना अधिकार वाली जमीन वर राहतस, जे त्या रस्ता वर शे, जे गालील ना समुद्र ना जोळे आणि यार्देन नदी ना पूर्व किनारा वर शे, गालील जिल्हा ना क्षेत्र जठे कईक दुसरा जाती लोक राहत होतात. 16तुमी लोक ज्या परमेश्वर ले बिगर वयखतस अंधकार मा राहीरायनात, तुमले एक महान मोठा उज्वल उजाया ले देखतीन. आणि हवू उजाया त्या लोकस्ले मुक्ती ना रस्ता दाखाळीन, जो परमेश्वर ले नई वयखतस आणि कायम ना मोत ना रास्ता वर शेत.” 17त्या टाईम पासून येशु नि प्रचार करान आणि हय सांगाले सुरुवात करना, “पापस पासून मन फिरावा कारण कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे.”
प्रथम शिष्यस्ले बलावन
(मार्क 1:16-20; लूक 5:1-11; योहान 1:35-42)
18येशु नि गालील ना समुद्र ना किनारा वर चालतांना दोन भाऊ म्हणजे शिमोन ले जेले पेत्र म्हणतस आणि तेना धाकला भाऊ अंद्रियाले समुद्र मा जाय टाकतांना देख कारण कि त्या मासा धरणारा होतात. 19येशु नि तेस्ले सांग, मना मांगे इपळा, मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे. 20तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन आणि तेना शिष्य बनी ग्यात.
21तठून पुळे जायसन येशु नि आखो दोन भावूस्ले म्हणजे जब्दी ना पोऱ्या याकोब आणि तेना भाऊ योहान ले देख त्या आपला बाप जब्दी ना संगे नाव वर आपला जायास्ले सुधारत होतात आणि तेस्ले बी बलाव. 22त्या लगेच नाव ले व आपला बाप ले सोळीसन तेना मांगे चालना ग्यात.
येशु न रोगीस्ले चांगल करन
(लूक 6:17-19)
23येशु पूर्ण गालील जिल्हा मा फिरत आणि तेस्ना प्रार्थना घरस्मा शिक्षण देत, आणि परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता ना प्रचार करत आणि लोकस्नी सर्वा प्रकार ना आजार आणि कमजोरीस्ले बरा करत ऱ्हायना. 24आणि सर्वा सिरीया प्रांत, ज्या गालील ना उत्तर दिशा मा स्थित होता, तेनी बातमी पसरी गई, आणि लोक सर्वा आजारिले, ज्या आल्लग-आल्लग प्रकारणा आजारस्मा आणि दुख मा पिडीत होतात. आणि जेस्ना मा दुष्ट आत्मा होतात आणि येळा आणि लखवा ना आजारीस्ले तेना जोळे लयनात आणि तेनी तेस्ले बर करा. 25आणि गालील जिल्हा, दकापलीस जिल्हा, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत, यार्देन नदी ना त्या पारून मोठी गर्दी तेना मांगे चालू लागणी.

Цяпер абрана:

मत्तय 4: AHRNT

Пазнака

Падзяліцца

Капіяваць

None

Хочаце, каб вашыя адзнакі былі захаваны на ўсіх вашых прыладах? Зарэгіструйцеся або ўвайдзіце