1
निर्ग. 6:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तेव्हा इस्राएलाला सांग, मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हास त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन, आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन.
Compare
Explore निर्ग. 6:6
2
निर्ग. 6:7
मी तुम्हास आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून काढून आणतो तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास समजेल.
Explore निर्ग. 6:7
3
निर्ग. 6:8-9
जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यामध्ये मी तुम्हास नेईन; व तो मी तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांस सांगितले. परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते नाउमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेनात.
Explore निर्ग. 6:8-9
4
निर्ग. 6:1
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहुबल त्यास दाखवले म्हणजे मग तो माझ्या लोकांस जाऊ देईल. कारण माझ्या बाहुबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.”
Explore निर्ग. 6:1
Home
Bible
Plans
Videos