देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.”