1
प्रक. 14:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत. आत्मा म्हणतो, “हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्यामागे जातात.”
Compare
Explore प्रक. 14:13
2
प्रक. 14:12
जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे.
Explore प्रक. 14:12
3
प्रक. 14:7
तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.
Explore प्रक. 14:7
4
प्रक. 14:9-11
आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करील आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेईल तोसुध्दा देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला, त्याचा क्रोधरुपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकऱ्यासमोर त्यास अग्नी आणि गंधक ह्यापासून पीडला जाईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर चढत राहतो; त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणाऱ्या कोणालाही रात्रंदिवस विसावा मिळणार नाही.
Explore प्रक. 14:9-11
5
प्रक. 14:1
नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.
Explore प्रक. 14:1
6
प्रक. 14:6
यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणाऱ्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती.
Explore प्रक. 14:6
7
प्रक. 14:8
मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षरस पाजला आहे.”
Explore प्रक. 14:8
Home
Bible
Plans
Videos