1
1 करिंथ 11:25-26
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्ताने प्रस्थापित झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” म्हणजेच जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.
Compare
Explore 1 करिंथ 11:25-26
2
1 करिंथ 11:23-24
जे मला प्रभूकडून मिळाले, तेच मी तुम्हांला सांगितले आहे, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली. आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा”.
Explore 1 करिंथ 11:23-24
3
1 करिंथ 11:28-29
म्हणून माणसाने प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे; कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.
Explore 1 करिंथ 11:28-29
4
1 करिंथ 11:27
म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्यासंबंधाने दोषी ठरेल.
Explore 1 करिंथ 11:27
5
1 करिंथ 11:1
जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.
Explore 1 करिंथ 11:1
Home
Bible
Plans
Videos