1
2 करिंथ 4:18
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी शाश्वत आहेत.
Compare
Explore 2 करिंथ 4:18
2
2 करिंथ 4:16-17
म्हणूनच आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसागणिक नवा होत आहे आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील.
Explore 2 करिंथ 4:16-17
3
2 करिंथ 4:8-9
आमच्यावर सर्व बाजूंनी संकटे आली, तरी आम्ही चिरडले गेलो नाही. आम्ही गोंधळलो, तरी निराश झालो नाही. आमचा छळ झाला, तरी आम्हांला टाकून देण्यात आले नाही. आमच्यावर प्रहार झाले, तरी आमचा विध्वंस झाला नाही.
Explore 2 करिंथ 4:8-9
4
2 करिंथ 4:7
तरीही आमचा आध्यात्मिक खजिना मातीच्या भांड्यात आहे, सामर्थ्याचा कळस देवामध्ये आहे, आमच्याकडे नाही, हे दाखविले जावे.
Explore 2 करिंथ 4:7
5
2 करिंथ 4:4
त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.
Explore 2 करिंथ 4:4
6
2 करिंथ 4:6
अंधारातून उजेड प्रकाशित होईल, असे देव म्हणाला त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या वैभवशाली ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात पाडला आहे.
Explore 2 करिंथ 4:6
Home
Bible
Plans
Videos