1
2 पेत्र 3:9
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा, अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा आहे.
Compare
Explore 2 पेत्र 3:9
2
2 पेत्र 3:8
परंतु प्रियजनहो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका! प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.
Explore 2 पेत्र 3:8
3
2 पेत्र 3:18
आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.
Explore 2 पेत्र 3:18
4
2 पेत्र 3:10
मात्र चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल, त्या दिवशी आकाश कर्कश नाद करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी उघडकीस येतील.
Explore 2 पेत्र 3:10
5
2 पेत्र 3:11-12
ही सर्व अशी लयास जाणार आहेत, म्हणून पवित्र व धार्मिक जीवन जगून देवाचा दिवस येण्याची वाट पाहणारे व तो दिवस लवकर यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारे तुम्ही असावे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि मूलतत्त्वे तप्त होऊन वितळतील.
Explore 2 पेत्र 3:11-12
Home
Bible
Plans
Videos