1
याकोब 1:2-3
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
माझ्या बंधूंनो, विविध प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना; कारण तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची परीक्षा झाल्याने धीर उत्पन्न होतो.
Compare
Explore याकोब 1:2-3
2
याकोब 1:5
परंतु जर तुमच्यापैकी कोणी सुज्ञतेत उणा असेल, तर त्याने ती देवाजवळ मागावी म्हणजे ती त्याला मिळेल कारण तो सर्वांना आनंदाने व उदारपणाने देतो.
Explore याकोब 1:5
3
याकोब 1:19
माझ्या प्रिय बंधूंनो, हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास मंद व रागास मंद असावा.
Explore याकोब 1:19
4
याकोब 1:4
धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न पडता तुम्ही प्रगल्भ व पूर्ण व्हावे.
Explore याकोब 1:4
5
याकोब 1:22
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
Explore याकोब 1:22
6
याकोब 1:12
जो माणूस कसोटीत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, कसोटीस उतरल्यावर त्याला मिळेल.
Explore याकोब 1:12
7
याकोब 1:17
दानशूरपणाची प्रत्येक चांगली कृती व प्रत्येक पूर्ण दान वरून मिळते. ते ज्योतिर्मंडळाचा निर्माता, जो बदलत नाही किंवा बदलल्यामुळे छाया निर्माण करीत नाही, त्याच्याकडून मिळते.
Explore याकोब 1:17
8
याकोब 1:23-24
जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही, तर तो आरशात स्वतःलापाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला आरशात पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो, हे लगेच विसरून जातो.
Explore याकोब 1:23-24
9
याकोब 1:27
देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत कैवार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, हे आहे.
Explore याकोब 1:27
10
याकोब 1:13-14
कोणाची परीक्षा होत असता, ‘देवाने मला मोहात पाडले’, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाइटाचा मोह पडत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. परंतु प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा तो मोहात पडतो.
Explore याकोब 1:13-14
11
याकोब 1:9
प्रभूने आपल्याला उच्च स्थितीपर्यंत वर उचलले म्हणून दीन स्थितीतील बंधूने आनंद मानावा
Explore याकोब 1:9
Home
Bible
Plans
Videos