1
याकोब 3:17
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
परंतु वरून येणारी सुज्ञता ही मुळात शुद्ध असते. शिवाय ती शांतिप्रिय, सौम्य व स्नेहवर्धक असते; ती करुणायुक्त असून तिला सत्कृत्यांचे पीक येते; ती पक्षपात व ढोंगबाजी यांपासून अलिप्त असते
Compare
Explore याकोब 3:17
2
याकोब 3:13
तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत.
Explore याकोब 3:13
3
याकोब 3:18
आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते.
Explore याकोब 3:18
4
याकोब 3:16
जेथे मत्सर व स्वार्थी वृत्ती आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक प्रकारचे कुकर्म आहे.
Explore याकोब 3:16
5
याकोब 3:9-10
आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत!
Explore याकोब 3:9-10
6
याकोब 3:6
जीभ ही आग आहे. ती अनीतीचे घर आहे, आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती आपल्या सृष्टिचक्राला नरकाग्नीने पेटवते.
Explore याकोब 3:6
7
याकोब 3:8
परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे.
Explore याकोब 3:8
8
याकोब 3:1
माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण शिक्षक म्हणून आपला अधिक कडक न्याय केला जाईल, हे तुम्हांला माहीत आहे.
Explore याकोब 3:1
Home
Bible
Plans
Videos