1
प्रकटी 14:13
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली, “लिही, प्रभूमध्ये मरणारे आत्तापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल कारण त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातात.”
Compare
Explore प्रकटी 14:13
2
प्रकटी 14:12
म्हणूनच देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वासाला धरून राहणारे पवित्र जन ह्यांच्याकडून सहनशीलतेची अपेक्षा केली जाते.”
Explore प्रकटी 14:12
3
प्रकटी 14:7
तो उच्च स्वरात म्हणाला, “देवाची भीती बाळगा व त्याचा गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याची आराधना करा.”
Explore प्रकटी 14:7
4
प्रकटी 14:9-11
त्याच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात भरपूर प्रमाणात ओतलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल आणि हे करणाऱ्यांना पवित्र देवदूतांसमक्ष व कोकरांसमक्ष अग्नी व गंधक ह्यापासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुगे वर येतो आणि जे श्वापदाची व त्याच्या मूर्तीची आराधना करतात, आणि जे कोणी त्याच्या नावाची खूण धारण करतात, त्यांना रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही.
Explore प्रकटी 14:9-11
5
प्रकटी 14:1
नंतर कोकरू सीयोन डोंगरावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. त्याचे व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक त्याच्याबरोबर होते.
Explore प्रकटी 14:1
6
प्रकटी 14:6
नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळात उडताना पाहिला, त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे सर्व राष्ट्रे, वंश, भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगावयास शाश्वत शुभवर्तमान होते.
Explore प्रकटी 14:6
7
प्रकटी 14:8
त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “तिचे पतन झाले! महान बाबेलचे पतन झाले! तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना प्यायला लावला.”
Explore प्रकटी 14:8
Home
Bible
Plans
Videos