1
प्रकटी 8:1
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कोकराने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले.
Compare
Explore प्रकटी 8:1
2
प्रकटी 8:7
पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि एक तृतीयांश पृथ्वी जळून गेली. एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.
Explore प्रकटी 8:7
3
प्रकटी 8:13
मी पाहिले तेव्हा एक गरूड अंतराळात उंच उडताना दृष्टीस पडला. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, “इतर तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत, तेव्हा त्यांच्या कर्ण्यांच्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर किती अनर्थ, अनर्थ, अनर्थ ओढवणार आहे!”
Explore प्रकटी 8:13
4
प्रकटी 8:8
दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले.
Explore प्रकटी 8:8
5
प्रकटी 8:10-11
मग तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा मशालीसारखा पेटलेला विशाल तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला. (त्या ताऱ्याचे नाव “कडुदवणा”) आणि पाण्याचा एक तृतीयांश भाग कडुदवणा झाला, त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली कारण ते पाणी कडू झाले होते.
Explore प्रकटी 8:10-11
6
प्रकटी 8:12
त्यानंतर चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व ताऱ्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यामुळे त्यांच्या प्रकाशाचे एक तृतीयांश तेज कमी झाले आणि एक तृतीयांश दिवसाचा तसेच एक तृतीयांश रात्रीचाही प्रकाश नाहीसा झाला.
Explore प्रकटी 8:12
Home
Bible
Plans
Videos