1
कलस्सैकरांस 3:13
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
Compare
Explore कलस्सैकरांस 3:13
2
कलस्सैकरांस 3:2
तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.
Explore कलस्सैकरांस 3:2
3
कलस्सैकरांस 3:23
जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा.
Explore कलस्सैकरांस 3:23
4
कलस्सैकरांस 3:12
यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.
Explore कलस्सैकरांस 3:12
5
कलस्सैकरांस 3:16-17
स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो. आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.
Explore कलस्सैकरांस 3:16-17
6
कलस्सैकरांस 3:14
आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.
Explore कलस्सैकरांस 3:14
7
कलस्सैकरांस 3:1
यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.
Explore कलस्सैकरांस 3:1
8
कलस्सैकरांस 3:15
ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.
Explore कलस्सैकरांस 3:15
9
कलस्सैकरांस 3:5
म्हणून आपल्यातील ऐहिक स्वभाव कायमचा ठार करा: जसे लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, कामवासना, दुष्ट इच्छा आणि लोभ जी मूर्तिपूजा आहे.
Explore कलस्सैकरांस 3:5
10
कलस्सैकरांस 3:3
कारण तुम्ही मृत असून, आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे.
Explore कलस्सैकरांस 3:3
11
कलस्सैकरांस 3:8
परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा.
Explore कलस्सैकरांस 3:8
12
कलस्सैकरांस 3:9-10
एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे. तुम्ही आता नवा मनुष्य धारण केला आहे, जो आपल्या उत्पन्न करणार्याच्या प्रतिमेमध्ये, ज्ञानामध्ये नवा होत आहे.
Explore कलस्सैकरांस 3:9-10
13
कलस्सैकरांस 3:19
पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी कठोरतेने वागू नका.
Explore कलस्सैकरांस 3:19
14
कलस्सैकरांस 3:20
लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो.
Explore कलस्सैकरांस 3:20
15
कलस्सैकरांस 3:18
पत्नींनो, जसे प्रभूला योग्य तसे तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा.
Explore कलस्सैकरांस 3:18
Home
Bible
Plans
Videos