1
उपदेशक 5:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.
Compare
Explore उपदेशक 5:2
2
उपदेशक 5:19
आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे.
Explore उपदेशक 5:19
3
उपदेशक 5:10
पैशावर प्रेम असणार्याला पैसा कधीच पुरेसा नसतो; जो कोणी संपत्तीवर प्रेम करतो, तो कधीही आपल्या मिळकती मध्ये समाधानी नसतो, हे सुद्धा व्यर्थच आहे.
Explore उपदेशक 5:10
4
उपदेशक 5:1
परमेश्वराच्या मंदिरात जाताना तू तुझी पावले सांभाळ. बोध ऐकण्यासाठी परमेश्वराच्या समीप जा, मूर्ख लोकांसारखे यज्ञबली देण्यापेक्षा बरे, कारण आपण चूक करीत आहोत, हे त्यांना कळत नाही.
Explore उपदेशक 5:1
5
उपदेशक 5:4
परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक.
Explore उपदेशक 5:4
6
उपदेशक 5:5
नवस करून न फेडण्यापेक्षा, तो न केलेला बरा.
Explore उपदेशक 5:5
7
उपदेशक 5:12
खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो कष्टकर्याला सुखाची झोप लागते. परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती त्यांना रात्री झोप येऊ देत नाही.
Explore उपदेशक 5:12
8
उपदेशक 5:15
प्रत्येकजण आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, आणि जसे सर्वजण येतात, तसेच ते परत जातात. त्यांचे कष्टार्जित असे काहीही त्यांच्या हातात घेऊन ते जाऊ शकत नाहीत.
Explore उपदेशक 5:15
Home
Bible
Plans
Videos