मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,” कारण असे लिहिले आहे:
“ ‘तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल
तुझे रक्षण काळजीपूर्वक करण्यासंबंधाने;
ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील,
म्हणजे तुझ्या पायाला दगडाची ठेच लागणार नाही.’ ”
येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर त्यांची परीक्षा पाहू नको.’ ”