येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईर याच्या घरून काही लोक आले व म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे,” आणि “आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.”
त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”