1
रोमकरांस 14:17-18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परमेश्वराचे राज्य खाणे व पिणे यात नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात आहे. कारण जो अशाप्रकारे ख्रिस्ताची सेवा करतो तो परमेश्वराला संतोष देणारा व मनुष्यांनी पारखलेला आहे.
Compare
Explore रोमकरांस 14:17-18
2
रोमकरांस 14:8
आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत.
Explore रोमकरांस 14:8
3
रोमकरांस 14:19
तर मग जेणेकरून शांती व परस्परांची वृद्धी होईल अशा गोष्टींच्या मागे आपण लागावे.
Explore रोमकरांस 14:19
4
रोमकरांस 14:13
यास्तव आपण यापुढे एकमेकांना दोषी ठरवू नये; तर असा निश्चय करावा की कोणी आपल्या बंधू किंवा भगिनीपुढे काही विघ्न किंवा अडखळण ठेवू नये.
Explore रोमकरांस 14:13
5
रोमकरांस 14:11-12
कारण असे लिहिले आहे: “ ‘प्रभू म्हणतात, मी जिवंत आहे म्हणून,’ ‘प्रत्येक गुडघा माझ्यापुढे टेकला जाईल; आणि प्रत्येक जीभ परमेश्वराचा स्वीकार करेल.’ ” तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.
Explore रोमकरांस 14:11-12
6
रोमकरांस 14:1
विश्वासाने दुर्बल असलेल्यांचा स्वीकार करा, तरी वादविवादाच्या गोष्टींमुळे भांडणे करू नका.
Explore रोमकरांस 14:1
7
रोमकरांस 14:4
दुसर्याच्या चाकराचा न्याय करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? चाकराचे स्थिर राहणे किंवा पतन यासाठी त्याचा धनी जबाबदार आहे आणि त्यांना स्थिर करण्यात येईल, कारण प्रभू त्यांना स्थिर करण्यास समर्थ आहे.
Explore रोमकरांस 14:4
Home
Bible
Plans
Videos