1
रोमकरांस 8:28
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
आणि आपल्याला माहीत आहे की, परमेश्वरावर प्रीती करणारे आणि जे त्याच्या संकल्पनेप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या कल्याणार्थ सर्वगोष्टी सहकारी ठरतात.
Compare
Explore रोमकरांस 8:28
2
रोमकरांस 8:38-39
कारण माझी खात्री आहे की ना मरण ना जीवन, ना देवदूत ना भुते, ना वर्तमान ना भविष्यकाळ, ना कोणती शक्ती, अथवा उंची, खोली आणि सृष्टीमधील कोणतीही गोष्ट आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील परमेश्वराच्या प्रीतीपासून आपणास विभक्त करू शकणार नाही.
Explore रोमकरांस 8:38-39
3
रोमकरांस 8:26
त्याच प्रकारे, पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास साहाय्य करतो. कारण प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा आपल्यासाठी शब्दाविना कण्हण्याने मध्यस्थी करतो.
Explore रोमकरांस 8:26
4
रोमकरांस 8:31
अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल?
Explore रोमकरांस 8:31
5
रोमकरांस 8:1
यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही.
Explore रोमकरांस 8:1
6
रोमकरांस 8:6
मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते
Explore रोमकरांस 8:6
7
रोमकरांस 8:37
नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत.
Explore रोमकरांस 8:37
8
रोमकरांस 8:18
तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत.
Explore रोमकरांस 8:18
9
रोमकरांस 8:35
मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय?
Explore रोमकरांस 8:35
10
रोमकरांस 8:27
आणि जो आपली अंतःकरणे शोधतो तो आत्म्याचे मन जाणतो, कारण आत्मा परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या लोकांसाठी मध्यस्थी करतो.
Explore रोमकरांस 8:27
11
रोमकरांस 8:14
कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत
Explore रोमकरांस 8:14
12
रोमकरांस 8:5
जे आपल्या शारीरिक स्वभावाला अनुसरून जीवन जगतात, त्यांची मने दैहिक गोष्टींकडे असतात, परंतु जे पवित्र आत्म्याला अनुसरून जीवन जगतात त्यांची मने आत्म्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकडे असतात.
Explore रोमकरांस 8:5
13
रोमकरांस 8:32
ज्यांनी स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्यांना दिले, तर ते आपल्याला त्यांच्यासोबत सर्वकाही उदारतेने देणार नाहीत काय?
Explore रोमकरांस 8:32
14
रोमकरांस 8:16-17
कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.
Explore रोमकरांस 8:16-17
15
रोमकरांस 8:7
कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही.
Explore रोमकरांस 8:7
16
रोमकरांस 8:19
कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे.
Explore रोमकरांस 8:19
17
रोमकरांस 8:22
कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूती वेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे.
Explore रोमकरांस 8:22
Home
Bible
Plans
Videos