1
युहन्ना 4:24
वऱ्हाडी नवा करार
देव आत्मा हाय, म्हणून हे आवश्यक हाय, कि त्याची आराधना करणारे, आत्माने अन् खरे पणान आराधना करावं.”
Compare
Explore युहन्ना 4:24
2
युहन्ना 4:23
पण तो दिवस येत हाय, अन् आता पण हाय, ज्याच्यात खरे भक्त देवाची आराधना आत्म्यान अन् खरे पणान करतीन, कावून कि देवबाप आपल्यासाठी अशीच आराधना करणाऱ्यायले बघत हाय.
Explore युहन्ना 4:23
3
युहन्ना 4:14
पण जो कोणी त्या पाण्यातून पेईन जे मी त्याले देईन, त्याले मंग अनंत काळापरेंत तहान लागणार नाई, पण जे पाणी मी त्याले देईन, तो त्याच्यात एक झरा बनून जाईन, जो त्यायले जीवन देणारा पाणी देईन अन् त्यायले अनंत जीवन देईन.”
Explore युहन्ना 4:14
4
युहन्ना 4:10
येशूनं तिले उत्तर देलं, “तुले नाई माईत कि देव तुले काय द्याची इच्छा ठेवते, अन् तुले नाई माईत कि कोण तुले पाणी मांगून रायला, जर तुले माईत असतं तर तू मले हे मांगतलं असतं अन् मी तुले तो पाणी देला असता जो जीवन देते.”
Explore युहन्ना 4:10
5
युहन्ना 4:34
येशूनं त्यायले म्हतलं, “माह्याले जेवण त्या देवाच्या इच्छेचे पालन करणे हाय ज्यानं मले पाठवलं हाय, अन् त्याच्या कामाले पूर्ण कराच हाय जे त्यानं मले सोपवले हाय.”
Explore युहन्ना 4:34
6
युहन्ना 4:11
तीन येशूले म्हतलं, “हे स्वामी, तुह्यापासी पाणी भऱ्याले तर काईच नाई हाय, अन् विहीर लय खोल हाय; तर मंग ते जीवनाच पाणी तुह्यापासी कुठून आलं?
Explore युहन्ना 4:11
7
युहन्ना 4:25-26
बाईनं त्याले म्हतलं, “मले मालूम हाय, मसीहा ज्याले ख्रिस्त म्हणतात, येणार हाय; जवा तो येईन, तवा तो आमाले सगळ्या गोष्टी सांगीन.” येशूनं तिले म्हतलं, “मी जो तुह्या संग बोलून रायलो, तोच हावो.”
Explore युहन्ना 4:25-26
8
युहन्ना 4:29
“चला, एका माणसाले पाहा, त्यानं माह्या बद्दल सगळं काई जे मी केलं होतं सांगतल; काय हा तर ख्रिस्त नाई हाय?”
Explore युहन्ना 4:29
Home
Bible
Plans
Videos