1
युहन्ना 6:35
वऱ्हाडी नवा करार
येशूनं त्यायले म्हतलं, “मीच जीवनाची भाकर हाय, भाकर जे अनंत जीवन देते जो माह्यापासी येतो त्याले कधीच भूक लागणार नाई अन् जो माह्यावर विश्वास ठेवतो, त्याले कधीच ताहान लागणार नाई.
Compare
Explore युहन्ना 6:35
2
युहन्ना 6:63
हा तो आत्मा हाय जो तुमाले जीवन देते, माणसाच्या शक्तीन असे नाई होऊ शकत, मी तुमाले ज्या गोष्टी बोललो हाय, जे जीवन देणारा आत्मा म्हणते.
Explore युहन्ना 6:63
3
युहन्ना 6:27
नाशवान जेवणासाठी मेहनत नका करू, पण त्या जेवणासाठी, जे अनंत जीवनापरेंत थांबून रायते, ज्याले मी, माणसाचा पोरगा तुमाले देईन, कावून कि देवबापान मले असं कऱ्याचा अधिकार देला हाय.”
Explore युहन्ना 6:27
4
युहन्ना 6:40
कावून कि माह्या पाठवण्यावाल्याची इच्छा हे हाय, कि जो कोणी पोराले पाईन, अन् त्याच्यावर विश्वास करीन, तो अनंत जीवन प्राप्त करीन, अन् मी त्याले आखरी दिवशी मेलेल्यातून जिवंत उठवीन.”
Explore युहन्ना 6:40
5
युहन्ना 6:29
येशूनं त्यायले उत्तर देलं, “देवाची हे इच्छा हाय, कि तुमी माह्यावर विश्वास करावं, ज्याले त्यानं पाठवलं हाय.”
Explore युहन्ना 6:29
6
युहन्ना 6:37
देवबाप जे काई मले देते ते सगळं माह्यापासी येईन, अन् जो कोणी माह्याल्या पासी येईन त्याचा मी कधीच तिरस्कार करणार नाई.
Explore युहन्ना 6:37
7
युहन्ना 6:68
तवा शिमोन पतरसन त्याले उत्तर देऊन म्हतलं, कि “प्रभू, आमी कोणाच्या पासी जाणार? अनंत जीवनाच्या गोष्टी तर फक्त तुह्याच पासी हाय.
Explore युहन्ना 6:68
8
युहन्ना 6:51
जीवनाची भाकर मीच हाय जे स्वर्गातून उतरलेली हाय, जो कोणी ह्या भाकरीतून खाईन, तो सर्वकाळ जिवंत राईन; अन् ते माह्य शरीर हाय, जे मी जगाच्या लोकायच्या जीवनासाठी समर्पित करीन.”
Explore युहन्ना 6:51
9
युहन्ना 6:44
कोणी पण माह्याल्या पासी येऊ शकत नाई, जोपरेंत देवबाप त्याले खेचून नाई घेत; अन् मी त्याले शेवटच्या दिवशी वापस मेलेल्यातून जिवंत करीन.
Explore युहन्ना 6:44
10
युहन्ना 6:33
कावून कि खरी भाकर जे देव देते तेच हाय, जे स्वर्गातून उतरून जगाले जीवन देते.”
Explore युहन्ना 6:33
11
युहन्ना 6:48
जीवन देणारी भाकर मीच हाय.
Explore युहन्ना 6:48
12
युहन्ना 6:11-12
तवा येशूनं भाकरी घेतल्या अन् देवाले धन्यवाद करून शिष्यायले देल्या अन् शिष्यायनं बसलेल्या लोकायले वाढून देल्या; तसचं मासोया पण जेवड्या पायजे तेवढ्या वाढून देल्या. जवा ते लोकं खाऊन तृप्त झाले, तवा येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, “उरलेल्या भाकरी एकत्र करा, कि काई फेकल्या नाई गेल्या पायजे.”
Explore युहन्ना 6:11-12
13
युहन्ना 6:19-20
मंग जवा ते डोंग्याले वल्ही मारत जवळपास तीन चार कोस निघून गेले, (जवळपास पाच ते सहा किलोमीटर) तवा त्यायनं येशूले समुद्रावर चालतांना, अन् डोंग्याच्या जवळ येतांना पायलं, अन् तवा ते भेऊन गेले. पण येशूनं त्यायले म्हतलं, “मी हावो; भेऊ नका.”
Explore युहन्ना 6:19-20
Home
Bible
Plans
Videos