तो कईक दिवसापरेंत तर मानलाचं नाई, पण आखरीले मनात विचार करून म्हतलं, जरी मी देवाले भेत नाई, अन् कोण्या माणसाची परवा करत नाई; तरी पण हे विधवा मले तरास देत रायत हाय, म्हणून मी तिचा न्याय करूनच टाकतो, नाई तर असं नाई व्हावं कि ते पुन्हा-पुन्हा येऊन आखरीले माह्याल्या नाकात दम करून टाकीन.”