पण ते आली, अन् येशूला नमस्कार करून म्हणू लागली, “हे प्रभू माह्याली मदत कर.” त्यानं उत्तर देलं, “लेकरायले पयले जेवू दे, कावून कि लेकरायची भाकर कुत्र्यायले टाकणं चांगलं नाई.” मंग तिनं येशूले म्हतलं खरं हाय प्रभू, तरी पण कुत्र्ये टेबलाखाली लेकरायच्या हातचा पडलेला चुरा खातात.