प्रेषितांची कृत्ये 19
19
इफिस येथे बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिष्य
1मग असे झाले की, अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहचला; तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले.
2त्यांना तो म्हणाला, “तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?” त्यांनी त्याला म्हटले, “पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही.”
3तो त्यांना म्हणाला, “तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
4पौलाने म्हटले, “योहान पश्चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.”
5हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला;
6आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.
7ते सगळे सुमारे बारा पुरुष होते.
इफिस येथे पौल
8नंतर तो सभास्थानात जाऊन देवाच्या राज्याविषयी वादविवाद करत व प्रमाण पटवत निर्भीडपणे तीन महिने बोलत गेला.
9मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले, आणि तुरन्नाच्या पाठशाळेत तो दररोज वादविवाद करू लागला.
10असे दोन वर्षे चालल्यामुळे आशियात राहणार्या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभू येशूचे वचन ऐकले.
11देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले;
12ते असे की, रुमाल किंवा फडकी त्याच्या अंगावरून आणून रोग्यांवर घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत.
13तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहूदी, दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, “ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हांला शपथ घालतो.”
14एक यहूदी मुख्य याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते.
15त्यांना दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, “येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे; पण तुम्ही कोण आहात?”
16मग ज्या माणसाला दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांना हटवले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते त्या घरातून घायाळ व उघडेनागडे होऊन पळून गेले.
17मग इफिसात राहणारे यहूदी व हेल्लेणी ह्या सर्वांना हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला.
18विश्वास ठेवणार्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली.
19जादूटोणा करणार्यांपैकी बर्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली; आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती पन्नास हजार रुपये झाली.
20ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.
पौलाचे पुढले बेत
21हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”
22मग आपली सेवा करणार्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.
इफिस येथील दंगल
23ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली.
24कारण देमेत्रिय नावाचा कोणीएक सोनार अर्तमी देवीचे रुप्याचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे.
25त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे.
26तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.
27ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे, तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते तिचे देऊळ क:पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.”
28हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की, “इफिसकरांची अर्तमी थोर!”
29इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.
30तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही.
31शिवाय आशिया प्रांताच्या अधिकार्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते, त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, नाटकगृहात जाऊन स्वत:ला धोक्यात घालू नका.
32तेव्हा कोणी काही, कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले; लोकांचा एकच गोंधळ उडाला; आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांना कळले नाही.
33मग आलेक्सांद्राला यहूदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले; तेव्हा आलेक्सांद्र हाताने खुणावून लोकांची समजूत घालू पाहत होता;
34परंतु तो यहूदी आहे असे समजल्यावर, सुमारे दोन तासपर्यंत, “इफिसकरांची अर्तमी थोर!” अशी सर्वांची एकच आरोळी झाली.
35मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व आकाशातून पडलेल्या मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे?
36ह्या गोष्टी निर्विवाद आहेत म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये.
37कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत.
38म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत; त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात.
39पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरवले जाईल.
40ह्या दंगलीचे कारण काय ह्याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपल्यावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे.”
41असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.
Currently Selected:
प्रेषितांची कृत्ये 19: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: