प्रेषितांची कृत्ये 27
27
पौलाचा रोमपर्यंतचा जलप्रवास - क्रेतापर्यंत
1नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसर्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले.
2तेव्हा आम्ही आशिया प्रांताच्या किनार्यावरील बंदरे करणार्या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो; तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनीकाचा अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
3दुसर्या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.
4मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा तोंडचा असल्यामुळे कुप्राच्या किनार्यावरून गेलो.
5नंतर किलिकिया व पंफुल्या ह्यांच्यासमोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुर्या बंदरास पोहचलो.
6तेथे इटलीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू शताधिपतीला मिळाले; त्यावर त्याने आम्हांला चढवले.
7मग पुष्कळ दिवसपर्यंत हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना, म्हणून आम्ही क्रेताच्या किनार्यावरून सलमोनासमोर गेलो.
8मग आम्ही मोठ्या प्रयासाने त्याच्या काठाकाठाने सुंदर बंदर नावाच्या ठिकाणी आलो; त्याच्याजवळ लसया नगर होते.
मिलितापर्यंत - तुफान व नौकाभंग
9तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की,
10“अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते.”
11तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले.
12ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे.
13मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले.
14परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला;
15त्यात तारू सापडून वार्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो.
16मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली.
17ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले; आणि आपण सुर्ती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले; मग ते तसेच वाहवत गेले.
18तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसर्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले;
19आणि तिसर्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले.
20मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला; त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली.
21तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती.
22तरी मी आता तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा; तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल;
23कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,
24‘पौला, भिऊ नकोस; तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे; आणि पाहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत.’
25म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडेल.
26तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल.”
27नंतर चौदाव्या रात्री अद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांनी अनुमान केले की, आपण कोणत्या तरी प्रदेशाजवळ येत आहोत.
28मग त्यांनी बुडीद टाकले तेव्हा वीस वावे पाणी भरले; थोडेसे पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले तेव्हा पंधरा वावे भरले.
29तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून चार नांगर सोडून ते उत्कंठेने दिवस उगवण्याची वाट पाहत बसले.
30मग नांगर नाळीवरूनही टाकावे ह्या निमित्ताने खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळायला पाहत होते;
31तेव्हा पौल शताधिपतीला व शिपायांना म्हणाला, “हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही.”
32तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापून ती पडू दिली.
33नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांना अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, “आज चौदा दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात; तुम्ही काही खाल्ले नाही.
34म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा; त्याच्याने तुमचा निभाव लागेल; कारण तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचादेखील नाश होणार नाही.”
35असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला.
36मग त्या सर्वांना धीर येऊन त्यांनीही अन्न खाल्ले.
37त्या तारवात आम्ही सर्व मिळून दोनशे शाहत्तर जण होतो.
38जेवून तृप्त झाल्यावर ते समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके करू लागले.
39दिवस उगवल्यावरही ती जमीन कोणती हे त्यांनी ओळखले नाही; पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृष्टीस पडला आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा त्यांनी विचार केला.
40मग नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले, त्याच वेळेस सुकाणाची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वार्यावर सोडून सपाटीची वाट धरली.
41मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसवले; तेव्हा नाळ रुतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले.
42तेव्हा बंदिवानांपैकी कोणी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी शिपायांनी मसलत केली;
43तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला; आणि त्याने हुकूम दिला की, ‘ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनार्यास जावे,
44आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर, कोणी तारवावरील दुसर्या कशावर बसून जावे.’ ह्याप्रमाणे सर्व जण निभावून किनार्यास पोहचले.
Currently Selected:
प्रेषितांची कृत्ये 27: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: