यशया 33
33
परमेश्वर उद्धार करील
1अरे लुटार्या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.
2हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी आशा धरून आहोत; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो.
3कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले; तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली.
4टोळ जसे सारे फस्त करतात तशी तुमची लूट हरण करतील, नाकतोडे धाड घालतात तसे तिच्यावर धाड घालतील.
5परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सीयोन न्यायशीलतेने व नीतिमत्तेने भरले आहे.
6तुझ्या काळी स्थिरता वसेल; तारण, सुज्ञता व ज्ञान ह्यांचे वैपुल्य होईल; परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल.
7पाहा, त्यांचे वीर बाहेर रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडत आहेत.
8राजमार्ग ओस पडले आहेत, कोणी प्रवासी आढळत नाहीत; त्याने करार मोडला, नगराचा उपमर्द केला, मनुष्यांचा धिक्कार केला.
9देश विलाप करतो; तो म्लान झाला आहे; लबानोन निस्तेज व शुष्क झाला आहे; शारोन अरण्यप्राय झाला आहे; बाशान व कर्मेल आपली पाने गाळत आहेत.
10परमेश्वर म्हणतो, “आता मी उठेन; मी उभा राहीन; आता मी आपली महती दाखवीन.
11तुम्ही भुसाचा गर्भ धराल व धसकट प्रसवाल; तुमचा श्वास हाच अग्नी आहे, तो तुम्हांला ग्राशील.
12राष्ट्रे भाजलेल्या चुनखडीसारखी भस्म होतील; काटेरी झुडपे तोडून आगीत जाळतात तशी ती होतील.”
13दूरच्या लोकांनो, मी काय केले ते ऐका; जवळच्या लोकांनो, माझे सामर्थ्य ओळखा.
14सीयोनेतील पातकी घाबरले आहेत. अधर्म्यांना कापरे भरले आहे. “भस्म करणार्या अग्नीसमीप आमच्यातला कोण राहील? सर्वकाळ पेटत राहणार्या अग्नीसमीप आमच्यातला कोण टिकेल?”
15जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ अव्हेरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो,
16तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही;
17तुझे नेत्र राजाला वैभवसंपन्न असा पाहतील. ते दूरवर विस्तृत झालेली भूमी पाहतील.
18त्या भयप्रसंगाचे तू आपल्या मनात चिंतन करशील; कोठे गेला तो गणना करणारा? कोठे गेला तो तोलणारा? कोठे आहे तो बुरुजांची गणना करणारा?
19आडदांड लोक, अस्पष्ट बोलणारे बाबर ओठांचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही अशा तोतर्या जिभेचे लोक ह्यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत.
20आमचे मेळे भरवण्याची सीयोन नगरी पाहा; यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल; जो कधी हलवत नाहीत, ज्याच्या मेखा कधी उपटत नाहीत, ज्याची एकही दोरी तोडत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल.
21आणखी तेथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल; ते रुंद नदीनाल्याचे ठिकाण होईल; त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही.
22कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.
23तुझे दोर ढिले पडले आहेत; ते डोलकाठीचा आधार स्थिर राखत नाहीत; ते शीड पसरत नाहीत; ते विपुल लूट वाटतात; लंगडेही लूट करतात.
24“मी रोगी आहे” असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.
Currently Selected:
यशया 33: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: