याकोब 3
3
जीभ ताब्यात ठेवणे
1माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे.
2कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.
3घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो.
4तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वार्याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात.
5तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते!
6जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे.
7श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे;
8परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे.
9तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो.
10एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत.
11झर्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय?
12माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खार्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
खोटे व खरे ज्ञान
13तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत.
14पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका.
15हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे.
16कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.
17वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.
18पण शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.
Currently Selected:
याकोब 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: