मीखा 4
4
परमेश्वराचे जागतिक शांतीचे राज्य
1शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील.
2देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या वाटांनी चालू.” कारण सीयोनेतून शिक्षण व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.
3तो देशोदेशींच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा न्याय ठरवील, तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांचे कोयते करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते येथून पुढे युद्धकला शिकणार नाहीत.
4ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.
5सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव ह्याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.
इस्राएलाची बंदिवासातून सुटका
6परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत मी लंगड्यांना जमा करीन; हाकून दिलेल्यांना व मी ज्यांना पिडले त्यांना एकत्र करीन.
7मी लंगड्यांना अवशेष म्हणून ठेवीन, दूर घालवलेल्यांचे मी समर्थ राष्ट्र करीन; आणि येथून पुढे सदासर्वकाळ परमेश्वर सीयोन डोंगरात त्यांच्यावर राज्य करील.
8हे कळपाच्या दुर्गा,1 सीयोनकन्येच्या डोंगरा, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल, यरुशलेमेच्या कन्येला राज्य पुन्हा प्राप्त होईल.
9तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत.
10हे सीयोनकन्ये, तुला कापरे भरू दे; प्रसूत होणार्या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे; कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलपर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल. तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैर्यांच्या हातून सोडवील.
11आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.”
12पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे.
13सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.
Currently Selected:
मीखा 4: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: