मार्क 5
5
गरसेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो
1मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले.
2आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरांतून निघून त्याला भेटला.
3तो कबरांत राहत असे व त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते.
4कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडेतुकडे केले होते; आणि त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते.
5तो नेहमी, रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे.
6येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला;
7आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.”
8कारण तो त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ.”
9त्याने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य; कारण आम्ही पुष्कळ आहोत.”
10आणि “आम्हांला ह्या देशातून घालवू नकोस” अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता.
11तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.
12तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला पाठवून दे.”
13मग त्याने त्यांना परवानगी दिली; तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरांत शिरले, आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला.
14डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतामळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.
15ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्याच्यात सैन्य होते तो, बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला; आणि त्यांना भीती वाटली.
16ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली.
17तेव्हा ‘आपण आमच्या प्रांतातून निघून जावे’ असे ते त्याला विनवू लागले.
18मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, ‘मला आपल्याजवळ राहू द्या.’
19परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, तर त्याला म्हटले, “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.”
20तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला; तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.
याइराची कन्या
21मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला; आणि तो समुद्राजवळ होता.
22तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला.
23त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे; तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”
24मग तो त्याच्याबरोबर निघाला; तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करत होते.
येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो
25आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पिडलेली एक स्त्री होती.
26तिने बर्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता.
27येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली.
28कारण ती म्हणत होती, “केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.”
29तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.
30आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोण शिवले?”
31त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, मला कोण शिवले?”
32मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार बघितले.
33तेव्हा ती स्त्री, आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तान्त सांगितला.
34तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”
येशू याइराच्या मुलीला जिवंत करतो
35तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरूजींना त्रास कशाला देता?”
36परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकार्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.”
37त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही.
38मग ते सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्शी रडणारे व आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला.
39तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.”
40तेव्हा ते त्याला हसू लागले; पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले, आणि मुलीचे आईबाप व आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला.
41नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, “तलीथा कूम;” ह्याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.”
42आणि लगेचच ती मुलगी उठून चालू लागली; कारण ती बारा वर्षांची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले.
43हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली, आणि तिला खायला देण्यास सांगितले.
Currently Selected:
मार्क 5: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: