नीतिसूत्रे 29
29
1पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो, त्याचा काही उपाय चालत नाही
2नीतिमान बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवतो तेव्हा प्रजा हायहाय करते.
3ज्या मनुष्याला ज्ञानाची आवड असते तो आपल्या बापाला आनंदित करतो, पण वेश्यांची संगत धरणारा आपल्या मालमत्तेची धूळधाण करतो.
4राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवतो, पण नजराणे घेणारा त्याचे वाटोळे करतो.
5जो आपल्या शेजार्याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो.
6दुर्जनांचे पाप पाशरूप आहे, पण नीतिमान स्तवन करून उल्लासतो.
7नीतिमान गरिबांच्या वादात मन घालतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.
8उद्दामपणा करणारे नगराला आग लावून देतात, पण सुज्ञ जन क्रोधाला घालवतात.
9सुज्ञाचा मूर्खाशी वाद असला तर मूर्ख रागावो किंवा हसो, त्याला स्वस्थता म्हणून नसतेच.
10खुनशी माणसे सात्त्विकाचा द्वेष करतात, पण सरळ माणसे त्याच्या जिवाला जपतात.
11मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध व्यक्त करतो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवतो.
12अधिपती खोट्या गोष्टीला कान देणारा असला, तर त्याचे सर्व सेवक दुष्ट बनतात.
13गरीब व सावकार ह्यांचा व्यवहार होतो; ह्या दोघांना प्रकाश देणारा परमेश्वर आहे.
14जो राजा गरिबांचा खरेपणाने न्याय करतो, त्याचे सिंहासन सदा टिकते.
15छडी व वाग्दंड ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले पोर आपल्या आईला खाली पाहायला लावते.
16दुर्जन बढती पावले म्हणजे गुन्हे वाढतात, नीतिमानांना त्यांचे पतन पाहायला सापडते.
17तू आपल्या मुलाला शासन कर, म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल, तो तुझ्या जिवाला हर्ष देईल.
18ईश्वरी दृष्टान्त न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य.
19चाकर शब्दांनी सुधारत नाही; त्याला समजते तरी तो पर्वा करीत नाही.
20बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.
21कोणी आपल्या चाकराला बाळपणापासून लाडाने वाढवले, तर तो शेवटी मुलगाच1 होऊन बसेल.
22रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.
23गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.
24चोराचा भागीदार आपल्या आत्म्याचा द्वेष्टा होय; तो शपथ ऐकतो तरी काही सांगत नाही.
25मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.
26अधिपतीची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात; पण मनुष्याचा निवाडा करणारा परमेश्वर आहे.
27कुटिल मनुष्याचा नीतिमानांना वीट वाटतो, आणि सरळमार्गी मनुष्याचा दुर्जनाला वीट वाटतो.
Currently Selected:
नीतिसूत्रे 29: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: