नीतिसूत्रे 5
5
बदफैली स्त्रीविषयी ताकीद
1माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे,
2म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे.
3कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते;
4तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते.
5तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात;
6म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही.
7तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका.
8तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस;
9गेलास तर तुझी अब्रू दुसर्यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील;
10तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्याच्या घरात जाईल;
11आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील;
12आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील : “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले?
13मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही.
14मंडळी व सभा ह्यांच्यादेखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे.”
15तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी.
16तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय?
17ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्यांना त्यांचा उपयोग न घडो.
18तुझ्या झर्याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा.
19रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो.
20माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?
21मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो.
22दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.
23त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो.
Currently Selected:
नीतिसूत्रे 5: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: