नीतिसूत्रे 8
8
ज्ञानाची थोरवी
1ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय?
2मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, चवाठ्यांवर ते उभे असते;
3ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते,
4“मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे.
5अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या; मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा.
6ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत.
7माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे.
8माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही.
9ज्याला समज आहे त्याला ती सर्व उघड आहेत; ती ज्ञान प्राप्त झालेल्यांना सरळ आहेत
10रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या.
11कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे; सर्व इष्ट वाटणार्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत;
12मी जे ज्ञान त्या माझी वस्ती चातुर्याबरोबर आहे; आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहेत.
13परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय; गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.
14मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत; मी सुज्ञतामय आहे; मला सामर्थ्य आहे.
15माझ्या साहाय्याने राजे राज्य करतात. अधिपती न्याय ठरवतात.
16माझ्या साहाय्याने अधिपती, सरदार, व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश अधिकार चालवतात.
17माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडते.
18संपत्ती व मान, टिकणारे धन व न्यायत्व, ही माझ्या हाती आहेत.
19माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षा उत्तम आहे; माझी प्राप्ती उत्कृष्ट रुप्यापेक्षा उत्तम आहे.
20मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते;
21माझ्यावर प्रीती करणार्यांना मी संपत्ती प्राप्त करून देते, त्यांची भांडारे भरते.
22परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यांतील पहिले कृत्य, असे मला निर्माण केले.
23अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.
24जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले.
25पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, डोंगरांपूर्वी, मला निर्माण केले;
26त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती.
27त्याने आकाशे स्थापली तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली;
28जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले;
29जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली; जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखले;
30तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागीर होते; मी त्याला नित्य आनंददायी होते; त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे;
31त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी; मनुष्यजातीच्या ठायी मी आनंद पावे.
32तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत;
33बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका.
34जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य.
35कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते;
36परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानी करून घेतो; जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.”
Currently Selected:
नीतिसूत्रे 8: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: