YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 12

12
दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना
मुख्य गवयासाठी; आठव्या (मंद्र) स्वरावर गायचे दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, साहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही; मानवजातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत.
2ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,
3खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको.
4ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?”
5परमेश्वर म्हणतो, “दीनांवरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे, ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्याला सुरक्षित ठेवीन.”
6परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत; भट्टीत सात वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुप्यासारखी ती आहेत.
7हे परमेश्वरा, तू त्यांना सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील.
8मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत चालतात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in