स्तोत्रसंहिता 136
136
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती
1परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे.
2देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.
3प्रभूंच्या प्रभूचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.
4जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
5ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
6ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
7ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
8ज्याने दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
9ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
10ज्याने मिसर देशातील प्रथमजन्मलेले मारून टाकले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
11ज्याने मिसरी लोकांतून इस्राएल लोकांना बाहेर आणले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
12ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
13ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
14ज्याने इस्राएलास त्यामधून पार नेले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
15ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
16ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
17ज्याने मोठेमोठे राजे मारून टाकले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
18ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
19ज्याने अमोर्यांचा राजा सीहोन ह्याला ठार मारले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
20ज्याने बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
21ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
22ज्याने आपला सेवक इस्राएल ह्याला तो वतन करून दिला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
23ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
24ज्याने आम्हांला आमच्या शत्रूंपासून सोडवले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
25जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.
26स्वर्गातील देवाचे उपकारस्मरण करा; कारण त्याची दया सनातन आहे.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 136: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: