स्तोत्रसंहिता 142
142
अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र); गुहेत असताना त्याने केलेली प्रार्थना.
1मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो; आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करतो.
2मी त्याच्यापुढे आपले गार्हाणे मांडतो; मी आपले संकट त्याला सांगतो.
3माझ्या ठायी माझा आत्मा व्याकूळ झाला आहे; तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे; मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश मांडला आहे.
4माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पाहा, मला ओळखणारा कोणी नाही; मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची पर्वा करणारा कोणी नाही.
5हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तूच माझा आश्रय आहेस, जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस.
6माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणार्यांपासून तू मला सोडव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत.
7मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ; तू मला औदार्य दाखवतोस, म्हणून नीतिमान माझ्याभोवती जमतील.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 142: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: