YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 3

3
प्रातःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
दावीद आपला पुत्र अबशालोम ह्याच्यापुढून पळाला त्या प्रसंगीचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झाले आहेत! माझ्यावर उठलेले पुष्कळ आहेत
2ह्याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत.
(सेला)3
3तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस.
4मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो.
(सेला)
5मी अंग टाकले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे.
6लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे. मी त्यांना भिणार नाही,
7हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्‍यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत.
8तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो.
(सेला)

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in