स्तोत्रसंहिता 44
44
पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी
मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.
2तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.
3ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती.
4हे देवा, तूच माझा राजा आहेस; याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर.
5आम्ही तुझ्या साहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू; आमच्यावर उठणार्यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू.
6मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही, माझी तलवार माझा बचाव करणार नाही;
7तर आमच्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करतोस आणि आमचा द्वेष करणार्यांना तू फजीत करतोस.
8आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो.
(सेला)
9तरी आता तू आम्हांला टाकले आहेस, आम्हांला फजीत केले आहेस; आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस.
10तू आम्हांला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस, आमचा द्वेष करणारे आम्हांला यथेच्छ लुटतात.
11तू आम्हांला मेंढरांसारखे भक्ष्यरूप केले आहेस; आणि तू राष्ट्राराष्ट्रांमध्ये आमची दाणादाण केली आहेस.
12तू आपले लोक विनामूल्य विकलेस, त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाहीस.
13तू आम्हांला आमच्या शेजार्यांच्या निंदेचा विषय केलेस, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केलेस.
14राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हांला केले आहेस. व आम्हांला पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केलेस.
15माझी फजिती नित्य माझ्यापुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापले आहे;
16कारण निंदा व निर्भर्त्सना करणार्यांचे शब्द मी ऐकत आहे.
17हे सर्व आमच्यावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही, तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही.
18आमचे मन फितूर झाले नाही; आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत;
19तरी तू आम्हांला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले.
20जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते,
21तर देवाने हे शोधून काढले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो.
22तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात.
23हे प्रभू, जागा हो, का झोपलास? ऊठ, आमचा कायमचा त्याग करू नकोस.
24तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस?
25आमचा जीव धुळीस मिळत आहे; आमचे पोट भूमीस लागत आहे.
26आमच्या साहाय्यार्थ ऊठ, आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 44: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: