स्तोत्रसंहिता 55
55
विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना
मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दाविदाचे मस्कील (बोधपर स्तोत्र).
1हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नकोस.
2माझ्याकडे लक्ष दे, माझे ऐक; मी चिंताक्रांत होऊन तळमळत व कण्हत आहे;
3आणि ते वैर्याच्या शब्दामुळे व दुर्जनाच्या जाचामुळे; कारण ते माझ्यावर अरिष्ट आणतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात.
4माझ्या ठायी माझ्या हृदयाला यातना होत आहेत; मरणाचे भय माझ्यावर कोसळले आहे.
5भीती व कापरे ही माझ्यावर येऊन गुदरली आहेत; धडकीने मला व्यापले आहे.
6मी म्हटले, “मला पारव्यासारखे पंख असते तर मी उडून जाऊन आराम पावलो असतो;
7पाहा, मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती;
(सेला)
8प्रचंड वायू व वादळ ह्यांच्यापासून आसरा मिळवण्याची मी त्वरा केली असती!”
9हे प्रभू, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोंधळ कर; कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत.
10अहोरात्र त्याच्या कोटावर ते सभोवताली फिरतात; त्यामध्ये दुष्टाई व उपद्रवही चालू आहेत.
11त्यामध्ये अनर्थ माजला आहे; त्याच्या पेठेतून जुलूम व कपट ही निघून जात नाहीत;
12कारण ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढे ज्याने तोरा मिरवला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो;
13पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस, माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास.
14आम्ही एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू, देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू.
15त्यांना अकस्मात मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे.
16मी तर देवाचा धावा करीन, आणि परमेश्वर मला तारील.
17संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकळुतीने आपले गार्हाणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल.
18माझ्यावर हल्ला करणार्यांपासून त्याने माझा जीव सोडवला आणि सुरक्षित ठेवला आहे; माझ्याशी कलह करणारे तर पुष्कळ होते.
19देव ऐकेल व त्यांचे पारिपत्य करील; तोच अनादि कालापासून राजासनारूढ आहे.
(सेला)
कारण त्यांची वृत्ती पालटत नाही आणि ते देवाला भीत नाहीत.
20त्याच्याशी जे मित्रत्वाने राहत होते त्यांच्यावर त्याने आपला हात उगारला; त्याने आपला करार मोडला;1
21त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.
22तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही.
23हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 55: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: