गीतरत्न 2
2
1मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे; मी खोर्यातले भुईकमळ आहे.
2काटेरी झुडपांमध्ये जसे भुईकमळ तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे.
3वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले.
4त्याने मला आपल्या पानगृहात आणले; त्याने माझ्यावर प्रेमध्वजा फडकावली.
5मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे;
6त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे; त्याचा उजवा हात मला आलिंगत आहे.
7यरुशलेमाच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका; तो राहील तितका वेळ राहू द्या.
8हा माझ्या वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या मारत, टेकड्यांवरून दौडत येत आहे!
9माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे; पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे; तो खिडकीतून डोकावत आहे तो झरोक्यांतून पाहत आहे.
10माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल.
11पाहा, हिवाळा गेला आहे; पाऊस संपून गेला आहे;
12पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत; पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे; आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे.
13अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये.
14अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.
15द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणार्या खोकडांना, त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.”
16माझा वल्लभ माझा, व मी त्याची; तो आपला कळप भुईकमळांत चारत आहे.
17शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोगपर्वतांवर फीर.
Currently Selected:
गीतरत्न 2: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: