YouVersion Logo
Search Icon

1 करिं. 16

16
यरूशलेम शहरातील गोरगरिबांसाठी वर्गणी
1आता, पवित्र जनाकरीता वर्गणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे. 2तुमच्यामधील प्रत्येकाने, त्यास यश मिळेल त्या मानाने, प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्रव्य जमवून ठेवावे. 3आणि मी आल्यावर तुम्ही पत्रे देऊन, तुम्ही स्वीकृत केलेल्या लोकांस तुमची देणगी यरूशलेम शहरास घेऊन जायला पाठवीन; 4आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील.
खाजगी बाबी व निरोप
5मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे. 6आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. 7कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हास भेटण्याची माझी इच्छा नाही कारण जर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो. 8पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन 9कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.
10जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या कारण तोसुध्दा माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे. 11यास्तव कोणीही त्यास तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्यास शांतीने पाठवा कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. 12पण बंधू अपुल्लोविषयी असे आहे की, त्याने इतर बांधवांबरोबर तुमच्याकडे यावे, अशी मी त्यास फार विनंती केली पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती पण त्यास सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल.
13सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. 14प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
15आता बंधूंनो स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हास चांगली माहिती आहे. ते अखया प्रांतातील प्रथमफळ आहे; आणि पवित्रजनांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हास विनंती करतो की, 16प्रत्येकजण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा. 17स्तेफन, फर्तूनात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला कारण त्यांनी माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करू शकला नसता. 18कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या.
19आशियातील मंडळ्या तुम्हास नमस्कार सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हास नमस्कार सांगतात, 20सर्व बंधू तुम्हास नमस्कार सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना अभिवादन करा.
21मी, पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहीत आहे. 22जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर तो शापित होवो, “मारानाथा; हे प्रभू ये” 23प्रभू येशूची कृपा तुम्हाबरोबर असो! 24ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

Currently Selected:

1 करिं. 16: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in