YouVersion Logo
Search Icon

उप. 3

3
प्रत्येक गोष्टीस उचित काळ
1प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.
2जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते.
रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते.
3ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते.
मोडण्याची वेळ आणि बांधण्याचीही वेळ असते.
4रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते.
शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते.
5धोंडे फेकून देण्याची वेळ असते आणि धोंडे गोळा करण्याची वेळ असते.
दुसऱ्या लोकांस आलिंगन देण्याची वेळ आणि आलिंगन आवरून धरण्याची वेळ असते.
6गोष्टी पाहण्याची वेळ असते आणि पाहणे थांबवण्याची वेळ असते.
गोष्टींचा संग्रह करण्याची वेळ असते आणि त्या फेकून देण्याचीही वेळ असते.
7वस्त्र फाडण्याचीही वेळ असते. आणि ते शिवण्याचीही वेळ असते.
शांत बसण्याचीही वेळ असते आणि बोलण्याचीही वेळ असते.
8प्रेम करण्याचीही वेळ असते आणि द्वेष करण्याचीही वेळ असते.
युध्द करण्याची वेळ असते आणि शांती करण्याचीही वेळ असते. 9काम करणारा जे श्रम करतो त्यास त्यामध्ये काय लाभ मिळतो? 10देवाने मानवजातीला जे कार्य पूर्ण करण्यास दिले ते मी पाहिले आहे.
11देवाने आपल्या समयानुसार प्रत्येक गोष्ट अनुरूप अशी बनवली आहे. त्याने त्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना निर्माण केली आहे. तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्य समजू शकत नाही.
12त्यांनी जिवंत असेपर्यंत आनंदीत रहावे व चांगले ते करीत रहावे याहून त्यास काही उत्तम नाही असे मला समजले. 13आणि प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे आणि त्याच्या सर्व कामातून आनंद कसा मिळवावा हे देवाचे दान आहे.
14देव जे काही करतो ते सर्वकाळ राहणार आहे असे मी समजतो. त्याच्यात अधिक काही मिळवू शकत नाही आणि त्याच्यातून काही कमीही करू शकत नाही. कारण लोकांनी त्याच्याजवळ आदराने यावे म्हणून देवाने हे सारे केले आहे.
15जे काही अस्तित्वात आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते.
आणि जे काही अस्तित्वात यावयाचे आहे ते यापूर्वीच अस्तित्वात होते.
देव मानवजातीला दडलेल्या गोष्टी शोधण्यास लावतो.
जीवनातील अन्याय
16आणि पृथ्वीवर न्यायाचे स्थान बघितले तर तेथे दुष्टता अस्तित्वात होती. आणि नीतिमत्वाच्या स्थानात पाहिले तर तेथे नेहमी दुष्टता सापडते. 17मी आपल्या मनात म्हटले, देव प्रत्येक गोष्टीचा व प्रत्येक कामाचा योग्यसमयी सदाचरणी आणि दुष्ट लोकांचा न्याय करील.
18मी माझ्या मनात म्हटले, देव मानवजातीची पारख करतो यासाठी की आपण पशुसारखे आहोत हे त्यास दाखवून द्यावे.
19जे मानवजातीस घडते तेच पशुसही घडते. जसे पशू मरतात तसे लोकही मरतात. ते सर्व एकाच हवेतून श्वास घेतात, पशुपेक्षा मानवजात वरचढ नाही. सर्वकाही केवळ व्यर्थ नाही काय? 20सर्व काही एकाच स्थानी जातात. सर्वकाही मातीपासून आले आहेत आणि सर्वकाही पुन्हा मातीस जाऊन मिळतात.
21मानवजातीचा आत्मा वर जातो आणि पशुचा आत्मा खाली जमिनीत जातो की काय हे कोणाला माहीत आहे? 22मग मी पाहिले की, मनुष्याने आपल्या कामात आनंद करावा यापेक्षा काही उत्तम नाही. कारण हा त्याचा वाटा आहे. कारण तो मरून गेल्यावर जे काही होईल ते पाहायला त्यास कोण परत आणील?

Currently Selected:

उप. 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in