YouVersion Logo
Search Icon

योए. 1

1
देशाची टोळांकडून नासाडी
1पथूएलाचा मुलगा योएल, ह्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे.
2अहो वडिलांनो, हे ऐका,
आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या.
तुमच्या पूर्वजांच्या दिवसात
किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय?
3ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा,
आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे,
व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे.
4कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले;
झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले;
आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.
5दारू पिणाऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा व रडा!
तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो, आक्रोश करा,
कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे.
6कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे,
ते बळकट व अगणित आहेत.
त्यांचे दात सिंहाचे आहेत,
आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत#प्रक. 9:7-10 पाहा .
7त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडवण्याची जागा केली आहे
आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे.
त्यांने साल सोलून दूर फेकली आहे.
फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत.
8जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.
9परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत.
परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.
10शेतांचा नाश झाला आहे.
आणि भूमी रडते#सुकून गेली आहे.
कारण धान्याचा नाश झाला आहे,
नवा द्राक्षरस सुकून गेला आहे
आणि तेल नासले आहे.
11तुम्ही शेतकऱ्यांनो, गहू व जवाबद्दल लज्जित व्हा,
आणि द्राक्षमळेवाल्यांनो,
गहू व जवसासाठी आक्रोश करा,
कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे.
12द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे,
डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड
अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत.
मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.
13याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा!
वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा.
माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा.
कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.
14पवित्र उपास नेमा,
आणि पवित्र सभेसाठी लोकांस एकत्र बोलवा.
तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांस एकत्र गोळा करा.
आणि परमेश्वरास आरोळी मारा.
15त्या भयानक दिवसाकरता हायहाय!
कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे.
सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल.
16आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले,
आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय?
17बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे,
धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत,
कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत,
कारण धान्य सुकून गेले आहे.
18प्राणी कसे कण्हत आहेत!
गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत.
मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.
19हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो.
कारण आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.
आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.
20रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे,
कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत
आणि आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.

Currently Selected:

योए. 1: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in