YouVersion Logo
Search Icon

नीति. 2

2
ज्ञानार्जनाचे फायदे
1माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील
आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
2ज्ञानाचे ऐकशील.
आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
3जर तू विवेकासाठी आरोळी करशील,
आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
4जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील,
आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
5तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल,
आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
6कारण परमेश्वर ज्ञान देतो,
त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
7जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो,
जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे,
8तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो,
आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.
9मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल,
आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.
10ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील,
आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.
11दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील,
आणि समंजसपणा तुला सांभाळेल.
12ते तुला वाईट मार्गापासून सोडविल,
कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,
13ते चांगले मार्ग सोडून,
अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत.
14जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात,
आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात.
15ते वाकडे मार्ग अनुसरतात,
आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात.
16ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील,
जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते.
17तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे,
आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे.
18कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे.
आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.
19जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत.
आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही.
20म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे,
व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.
21कारण योग्य करतात तेच देशात घर करतील,
आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.
22परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल,
आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.

Currently Selected:

नीति. 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in