YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 137

137
बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत
1आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो;
आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
2तेथील वाळुंजावर
आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
3तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले
आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले,
सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
4परक्या देशात
आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
5हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो,
तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
6जर मी तुला विसरलो,
जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य
विषयाहून अधिक मानले नाही
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
7हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या
त्या दिवसाची आठवण कर,
ते म्हणाले, ती पाडून टाका,
पायापर्यंत पाडून टाका.
8हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस,
कारण जसे तू आम्हास केले तसे,
जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.
9जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो
तो आशीर्वादित होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in