YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 39

39
आयुष्याची क्षणभंगुरता
मुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र.
1मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन,
म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.”
2मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले.
आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या.
3माझे हृदय तापले,
जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले.
तेव्हा शेवटी मी बोललो.
4हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे,
आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे,
मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव.
माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत.
आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही.
खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
6खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो,
खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो,
पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
7हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू?
तूच माझी एक आशा आहेस!
8माझ्या अपराधांवर मला विजय दे,
मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
9मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही.
कारण हे तुच केले आहेस.
10मला जखमा करणे थांबव,
तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
11जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस.
कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो.
खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
12परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
माझ्याकडे कान लाव.
माझे रडणे ऐक,
कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
13तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव,
म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in