YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 48

48
सीयोनेचे सौंदर्य व वैभव
कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत.
1आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर,
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
2सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे,
त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.
3देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.
4कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत,
ते एकत्र येऊन चढाई करून आले.
5त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
ते निराश झाले आणि पळत सुटले.
6भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला.
प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
7पूर्वेकडच्या वाऱ्याने
तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
8होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात,
आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
10देवा, जसे तुझे नाव आहे,
तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
11तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो,
यहूदाची कन्या हर्ष करोत.
12सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.
13उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा.
नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे.
तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in