YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 49

49
संपत्तीवर भरवसा ठेवण्याचा वेडेपणा
मुख्य गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र.
1सर्व लोकांनो, हे ऐका.
जगाचे सर्व रहिवासी, तुम्ही हे ऐका.
2गरीब आणि श्रीमंत दोघेही,
उच्च आणि नीच.
3माझे मुख ज्ञान बोलेल,
आणि माझ्या हृदयातील विचार समंजसपणाचे असणार.
4मी दृष्टांताकडे आपले कान लावीन,
मी आपली गोष्ट वीणे सोबत सुरु करणार.
5संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू?
6जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात,
आणि आपल्या धनाच्या विपुलतेविषयी बढाई मारतात,
7त्यातील कोणीही आपल्या भावाला खंडून घेण्यास समर्थ नाही,
किंवा त्याच्यासाठी देवाकडे खंडणी देववत नाही.
8कारण त्यांच्या जीवाची खंडणी महाग आहे,
आणि तिची भरपाई करणे कधीच शक्य नाही.
9यासाठी की त्यांना सर्वकाळ जगावे,
म्हणजे त्यांचे शरीर कुजणार नाही.
10कारण सर्वजण बघतात की बुद्धीमान मरतो, मूर्ख आणि मतिमंद नष्ट होतो.
आणि आपली संपत्ती इतरांसाठी सोडून जातात.
11त्यांच्या मनातील विचार हे असतात की,
त्यांचे कुटूंब सर्वकाळ राहणार,
आणि ज्या ठिकाणी ते राहतात ते पिढ्यानपिढ्या राहणार,
ते आपल्या भूमीस आपले नाव देतात.
12परंतु संपत्ती असणारा मनुष्य सर्वकाळ राहत नाही,
तो पशूसारखाच नाश होणारा आहे.
13हा त्यांचा मार्ग मुर्खपण आहे,
तरी त्यांच्या मागे येणारे त्याचे असे म्हणजे मंजूर करतो.
14ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात.
मरण त्यांचा मेंढपाळ आहे.
सरळ त्यांच्यावर धनीपण करतील असे सामर्थ्य त्यांना असेल.
15परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार.
तो मला जवळ करणार.
16जेव्हा कोणी श्रीमंत होतो आणि त्याच्या घराचे सामर्थ्य वाढते,
तर तू भयभीत होऊ नको.
17कारण तो मरेल तेव्हा काहीच सोबत घेऊन जाणार नाही.
त्याचे सामर्थ्य त्याच्या मागे खाली उतरणार नाही.
18जरी तो आपल्या जीवनात आपल्या जीवाला आशीर्वाद देत असेल,
आणि तू आपल्यासाठी जगला असता मनुष्यांनी तुझी स्तुती केली.
19तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीकडे जाणार,
ते कधीच प्रकाश पाहणार नाहीत.
20ज्याकडे संपत्ती आहे, परंतु त्यास काही समजत नाही,
तर तो नाश होणाऱ्या पशूसारखा आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in