YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 88

88
मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
कोरहाच्या मुलांची स्तोत्रे
1हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा,
मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.
2माझी प्रार्थना ऐक;
माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
3कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे,
आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे.
4खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत;
मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.
5मला मृतामध्ये सोडून दिले आहे;
अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो,
ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस,
ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
6तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात,
काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.
7तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे,
आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.
8तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात.
त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे;
मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.
9कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत;
हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे.
मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
10तू मृतांसाठी चमत्कार करशील काय?
जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?
11तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा
मृतांच्या जागी घोषणा होईल का?
12तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात
किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?
13परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;
सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
14हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास?
तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
15मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे;
मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.
16तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे,
आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे.
17त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे;
त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
18तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस.
माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in