स्तोत्र. 93
93
परमेश्वराचे माहत्म्य
1परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे;
परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे.
जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
2तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे;
तू सर्वकाळापासून आहेस.
3हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे;
आपला आवाज उंचावला आहे,
महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
4खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड
लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला
परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
5तुझे नियम अतिसत्य आहेत;
हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता
सदासर्वकाळ शोभते.
Currently Selected:
स्तोत्र. 93: IRVMar
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.