1 करिंथ 7
7
विवाह व सूटपत्र ह्यांविषयीचे प्रश्न
1तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी मी उत्तर देत आहे. पुरुषाने स्त्रीला स्पर्श न क रणे बरे. 2परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. 3पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा व एकमेकांचे समाधान करावे. 4पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. 5एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये.
6मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर एक सवलत म्हणून सांगतो. 7खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे.
8आता जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, माझ्यासारखे एकटे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. 9तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे.
10परंतु विवाहितांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. 11परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये.
12इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर एका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये 13आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल, तर त्याला तिने घटस्फोट देऊ नये. 14कारण पत्नीच्याद्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्याद्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे. असे नसते तर त्यांची मुलेबाळे अपवित्र असती. परंतु आता ती पवित्र आहेत. 15तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते, तर ती वेगळी होवो, अशा प्रसंगी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनी बांधील नाहीत. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे; 16कारण पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? किंवा पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक?
17ते काहीही असो, प्रत्येकाला प्रभूने नेमून दिलेले जीवन आणि प्रत्येकाला देवाने केलेले पाचारण ह्यानुसार त्याने चालावे. सर्व ख्रिस्तमंडळ्यांना मी हाच नियम घालून देतो. 18सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंतेच्या खुणा काढून टाकू नयेत; कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये. 19सुंता होणे किंवा सुंता न होणे ह्याला काही महत्त्व नाही तर देवाच्या आज्ञा पाळणे, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. 20ज्याला ज्या स्थितीत पाचारण झाले असेल, त्याने त्याच स्थितीत राहावे. 21तू गुलाम असता, तुला पाचारण झाले आहे काय? हरकत नाही, पण तुला स्वतंत्र होता येत असेल तर खुशाल स्वतंत्र हो; 22कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले आहे, तो गुलामगिरीतून स्वतंत्र केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच स्वतंत्र असताना ज्याला पाचारण झाले आहे तो ख्रिस्ताचा दास आहे. 23तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून माणसांचे गुलाम होऊ नका. 24बंधुजनहो, ज्या स्थितीत पाचारण झाले असेल त्या स्थितीतच प्रत्येकाने देवाच्या सहवासात राहावे.
25कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या प्रभूने त्याच्या कृपेने मला विश्वासपात्र ठरवले आहे, तो मी आपले मत सांगतो.
26सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत जो ज्या स्थितीत असेल, त्या स्थितीत त्याने राहावे, हे त्याला बरे. 27तू पत्नीला बांधील आहेस काय? असलास तर मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून विभक्त झाला आहेस काय? असलास तर लग्न करण्याचा विचार करू नकोस. 28तथापि तू लग्न केलेस म्हणजे पाप केलेस, असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले, असेही होत नाही, मात्र अशांना ह्या जीवनात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत, अशी माझी इच्छा आहे.
29बंधुजनहो, मला हेच सांगायचे आहे की, नेमलेला काळ कमी करण्यात आला आहे म्हणून ह्यापुढे ज्याला पत्नी आहे, त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे राहावे. 30जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करीत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही नसल्यासारखे 31आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे राहावे कारण ह्या जगाचे बाह्यस्वरूप लयास जात आहे.
32तुम्ही निश्चिंत असावे, अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभू कसा संतुष्ट होईल, अशी चिंता करतो. 33परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतुष्ट करावे, अशा भौतिक गोष्टींची चिंता करतो. ह्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते. 34जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी काळजी करते. परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे अशा सांसारिक गोष्टींविषयी उत्सुकता बाळगते.
35तुमच्यावर बंधने आणण्यासाठी नव्हे तर तुमच्याकडून उत्तम आचरण घडावे व प्रभूची एकाग्रतेने सेवा व्हावी म्हणून मी हे तुमच्या हितासाठी सांगतो.
36परंतु जर कोणाला असे वाटत असेल की, वाङ्निश्चय केलेल्या कुमारिकेबरोबर आपण अयोग्य प्रकारे वागतो आणि जर त्याच्या भावना अनावर होत असतील, तर त्याने लग्न करावे; तो पाप करत नाही. 37तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला संयम आहे, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे आणि त्या कुमारिकेला तसेच राहू द्यावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो योग्य करतो. 38जो त्या कुमारिकेबरोबर लग्न करतो तो योग्य करतो आणि जो लग्न करत नाही, तो अधिक योग्य करतो.
39पती जिवंत आहे, तोपर्यंत पत्नी बांधील आहे. पती मरण पावल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ ख्रिस्ती माणसाबरोबर, लग्न करायला ती मोकळी आहे. 40पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल. मलाही पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभते, असे मला वाटते.
Currently Selected:
1 करिंथ 7: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: