1 तीमथ्य 6
6
दास
1जे दास म्हणून जोखडाखाली आहेत, त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास पात्र आहेत, असे मानावे, ह्यासाठी की, देवाच्या नावाची व त्याच्या धर्मसत्याची कोणीही निंदा करणार नाही. 2ज्या दासांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना ते बंधूसमान आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर त्यांचे अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो, ते त्यांना प्रिय असलेले विश्वास ठेवणारे आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर.
खोटे शिक्षण व खरी संपत्ती
3जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने व धार्मिक शिक्षण मान्य करत नाही, 4तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे विकृत झालेला आहे. ह्यामुळे हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय हे सारे उत्पन्न होते. 5मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा.
6समाधानी धार्मिक जीवन हा एक महान लाभ असतो. 7आपण जगात काही आणले नाही आणि निश्चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही! 8तर मग आपल्याला जे अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात तृप्त असावे. 9परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात; 10कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.
सद्बोध
11हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर. 12श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस. 13सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, 14आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू हे आदेश निष्कलंकपणे व निर्दोषपणे पाळ. 15जो धन्य व एकमेव अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही 16आणि कोणी पाहू शकत नाही, तो प्रभू येशूचे प्रकट होणे यथाकाळी सिद्धीस नेईल, त्याला सन्मान व शाश्वत सामर्थ्य असो. आमेन.
17प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी. 18चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. 19अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील.
20हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ; 21कारण ते ज्ञान स्वीकारून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत.
तुम्हांला कृपा मिळो. आमेन.
Currently Selected:
1 तीमथ्य 6: MACLBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: